पंचगंगा पाणी पातळी 29 फूटाने खाली
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. नद्यांमधील पाण्याची पातळी कमी होत असून, पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांपर्यंत खाली आली आहे. असे असले तरी, जिल्ह्यातील 38 बंधारे अजूनही पाण्याखाली असल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत आहे. पाऊस कमी झाला असला तरी, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असल्याने धरणातून सध्या 1428 क्यूसेक आणि पॉवर हाऊसमधून 1500 क्यूसेक, असा एकूण 2928 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, वारणा धरणातून 11960 क्यूसेक तर दूधगंगा धरणातून 6100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
advertisement
पावसाच्या उघडीपमुळे नागरिकांची वर्दळ
बुधवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, आणि गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ वाढली होती. सायंकाळनंतर मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.
5 राज्य, 9 जिल्हा मार्ग अजूनही बंद
पावसामुळे जिल्ह्यातील वाहतुकीवर अजूनही परिणाम दिसून येत आहे. 5 राज्य मार्ग आणि 9 प्रमुख जिल्हा मार्ग अद्यापही बंद आहेत. यामध्ये शिरढोण-कुरुंदवाड मार्गावरील शिरढोण पूल पाण्याखाली असल्याने एसटी वाहतूक बंद आहे. तसेच, जमखंडी-कुडची मार्गावरील कुडची पूल पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूकही थांबली आहे.
हे ही वाचा : Shravan Month : श्रावणात देवदर्शनाला जायचंय? जालन्यातून ST महामंडळाकडून विशेष गाड्या, संपूर्ण यादी
हे ही वाचा : Weather Alert: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुफान पाऊस? हवामान विभागाकडून नवी माहिती