Shravan Month : श्रावणात देवदर्शनाला जायचंय? जालन्यातून ST महामंडळाकडून विशेष गाड्या, संपूर्ण यादी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
श्रावण मासानिमित्त फिरण्यासाठी जाण्याची इच्छा असलेल्या मराठवाड्यातील पर्यटक आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे.
जालना: श्रावण मासानिमित्त फिरण्यासाठी जाण्याची इच्छा असलेल्या मराठवाड्यातील पर्यटक आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. जालना एसटी विभागाच्या जालना आगारांतर्गत श्रावण मासानिमित्त धार्मिक तीर्थस्थळी पर्यटन आणि देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सोमवार, शनिवार, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे.
विभागातून सोडण्यात येणाऱ्या बसेस जालना, बदनापूर, फुलंब्री - वेरुळ (घृष्णेश्वर), खुलताबाद (भद्रा मारोती) या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. जालना, बदनापूर, फुलंब्री, वेरुळ-खुलताबाद दर शनिवार आणि सोमवार सकाळी दहा वाजता आणि दुपारी पाच वाजता, अष्टविनायक देवदर्शनाला जाण्यासाठी जालना, सिद्धटेक, मोरगाव, थेऊर, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली-रांजणगाव अश्या बस असतील.
advertisement
तसेच तुळापूर, पंढरपूर - अक्कलकोट -गाणगापूर - परळी, औंढा नागनाथ या मार्गावर दर एकादशीच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता बस सोडण्यात येणार आहे. त्याशिवाय भाविकांच्या मागणीनुसार तीर्थस्थळी पर्यटन आणि देवदर्शनासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भाविकांच्या मागणीनुसार देणार बस सुविधा
view commentsप्रवाशी भाविकांच्या मागणीनुसार सोमवार, शनिवार, तसेच संकष्ट चतुर्थी अशा महत्त्वाच्या दिवशी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवासदेखील सहज आणि सुखद होणार असून, भाविकांना सेवेचा लाभ घ्यावा, असे आगार व्यवस्थापक अजिंक्य जैवाळ यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 31, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Shravan Month : श्रावणात देवदर्शनाला जायचंय? जालन्यातून ST महामंडळाकडून विशेष गाड्या, संपूर्ण यादी


