3 राज्यमार्ग, 8 जिल्हा मार्ग बंद
धरणक्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राधानगरी धरण क्षेत्रात 69 मिमी, वारणा धरण क्षेत्रात 29 मिमी, तर दूधगंगा धरण क्षेत्रात 46 मिमी पाऊस झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 2928 घनफूट, तर वारणा धरणातून 13 हजार 198 घनफूट पाणी सोडले जात आहे. नद्यांची पाणी पातळी कमी होत असली तरी, रात्री आठ वाजता पंचगंगेची पातळी 32.09 फुटांवर होती. खासगी मालमत्तेची पडझड होऊन 4.98 लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे 3 राज्य मार्ग आणि 8 प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. यासोबतच एस.टी. बसची शिरढोण ते कुरुंदवाड, जयसिंगपूर ते धरणगुत्ती आणि जमखंडी ते कुडची या तीन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
advertisement
अनेक बंधारे पाण्याखाली
दूधगंगा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सांडव्यावरून 4500 क्युसेक, तर वीजगृहातून 1500 क्युसेक, असा एकूण 6000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दूधगंगा नदीवरील सात बंधारे आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. बुधवारी धरण परिसरात 20 मिमी पावसाची नोंद झाली. धरणात सध्या 21.20 टीएमसी (83.11 टक्के) पाणीसाठा आहे. सोळांकूर-पंडेवाडी, सुळंबी-सावर्डे (जुना बंधारा), मालवे-तुरंबे, वाळवा-चंद्रे, बाचणी-वडकशिवाले यांसारखे छोटे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत.
हे ही वाचा : Weather Alert: वारं आता बदललं, 7 जिल्ह्यांना नवीन अलर्ट, 31 जुलैचा हवामान अंदाज
हे ही वाचा : Mumbai Rain: महिनाअखेर बदलली हवा, मुंबई, ठाण्याला अलर्ट नवा, आजचा हवामान अंदाज