सकाळी साडेपाच वाजता श्रीमंत शाहू महाराज हे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जालना इथल्या अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज हे आज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
advertisement
दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली होती. जरांगे पाटील यांनी देखील संभाजीराजे यांचा मान राखत पाणी पिलं होतं. त्यानंतर देखील त्यांनी फोन करून जरांगे पाटील यांच्या तब्येतची चौकशी केली, तसेच त्यांना काळजी घेण्याचीही विनंती केली.