कोकण रेल्वेचे हे ॲप मराठीसह चार भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये प्रवाशांना रेल्वेगाड्यांची सद्यस्थिती आणि तपशीलवार वेळापत्रक पाहता येणार आहे. स्टेशन्ससह रेल्वेतील केटरिंग सेवा, महिला प्रवाशांसाठी खास सुविधा आणि विविध हेल्पलाइन क्रमांक यांची माहिती देण्यात आली आहे. अॅपमध्ये कोकण रेल्वेचा इतिहास, मैलाचे दगड आणि विविध प्रकल्पांची माहिती देखील दिली गेली आहे.
advertisement
Navratri 2025: कर्णपुऱ्यातील तुळजाभवानीच्या दर्शन वेळेत मोठा बदल, भाविकांसाठी विशेष निर्णय
इतकंच नाहीतर कोकणातील प्रसिद्ध स्थळांची माहिती देखील या ॲपमध्ये उपलब्ध आहे. हे ॲप कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी जोडलेलं असल्याने सर्व अधिकृत माहिती सहज मिळू शकणार आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवासादरम्यान सुरक्षा जागरूकता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे. उत्सवकाळात कोकणात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
गणेशोत्सवामध्ये जादा गाड्या चालवल्यानंतर आता दसरा आणि दिवाळीत देखील कोकण रेल्वेत मोठी प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत असेल.