आले आवकेत सुधारणा: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2733 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1162 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3300 ते 5400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 724 क्विंटल आल्यास 5145 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
शेवग्याची आवक कमीच: राज्याच्या मार्केटमध्ये आज 258 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 210 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 10000 ते 16000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 30 क्विंटल शेवग्यास प्रतीनुसार 11700 ते 27500 दरम्यान सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाचे भाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 983 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 445 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 11200 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.