मुंबई विमानतळावर सुरक्षा उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात आल्या आहेत. विमान अद्याप धावपट्टीवर उतरले नसून, त्यासाठी खास विशिष्ट (प्रायोरिटी/इमर्जन्सी) श्रेणी जाहीर करण्यात आली आहे. सर्व सुरक्षा पथके तैनात असून, बॉम्ब तपास पथक, CISF, विमानतळ पोलिस, आणि आपत्कालीन कर्मचारी सज्ज आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ईमेलमध्ये विमानात मानवी बॉम्ब असल्याचा उल्लेख होता. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आला आहे. विमानतळावर स्वतंत्र पार्किंग बे आणि अलग ठेवण्याची जागा तयार करण्यात आली असून, विमान उतरताच प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढून सखोल तपासणी केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
मागील महिन्यातही मिळाली होती धमकी...
मागील महिन्यातही विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय (RGIA) विमानतळाला १ नोव्हेंबर रोजी एक धमकीचा ईमेल मिळाला होता. यामध्ये जेद्दाहहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात "मानवी बॉम्ब" असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर विमान मुंबईला वळवण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षा तपासणी अंती ही एक अफवा असल्याचे समोर आले.
