केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ राज्यातील 19 लाख 20 हजार 85 हजार घेत आहेत. या योजनेचा लाभे घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला होता.त्यानुसार त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत होते. पण आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या अर्जाबाबत तक्रारी आल्या आहेत.त्यांच्या अर्जाची छाननी होणार आहे.
advertisement
त्यामुळे जर सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे, असा निकष लावला जर या शेतकरी महिलांना लावला तर 19 लाख 20 हजार 85 हजार शेतकरी बहिणींवर लाभ कपातीची टांगती तलवार येऊ शकते. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहिण योजनेला लाभ घेऊ द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय फडणवीस सरकारला घ्यावा लागणार आहे.
शेतकरी सन्मान योजनेत सुमारे 20 लाख, राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतरण योजनेतील 10 लाख 90 हजार 465 जणांना या नियमांचा फटका बसू शकतो. तिन्ही योजनेतील 30 लाख 10 हजार 550 शेतकरी बहिणींवर टांगती तलवार येऊ शकते.
अर्ज बाद होण्याचे निकष काय?
- कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
- घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
- शासकीय नोकरी अलकाना घेतलेला योजनांचा लाभ
- एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार
या निकषानुसार ज्या महिला लाभ घेत आहेत, त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.