नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण कोण?
जयश्री विष्णुपंत थोरात - भारतीय जनता पार्टी
भाग्यश्री सुयोग सावकारे - शिवसेना (उबाठा)
माधुरी अविनाश शेजवळ - काँग्रेस
कल्याणी विठ्ठल आरणे - लोकक्रांती सेना
अनिता सुरेश आरणे - अपक्ष
मेघना ज्ञानेश्वर खंडीझोड - अपक्ष
सायली दिगंबर मोरे - अपक्ष
यंदा नगराध्यक्ष पदासाठी मुख्य लढत भाजपच्या सौ. जयश्री थोरात आणि लोकक्रांती सेना (पुरोहित गट) पॅनलच्या डॉ. कल्याणी आरणे यांच्यात होत असल्याचे चित्र आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरांत जाऊन प्रचार केला. सभा, बैठका, सोशल मीडियाचा वापर आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात आली होती.
advertisement
नगरपरिषदेच्या २१ नगरसेवक पदांसाठीही निवडणूक चुरशीची ठरली. भाजप, लोकक्रांती सेना, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यामुळे सर्व प्रभागांमध्ये राजकीय वातावरण तापले होते. काही प्रभागांमध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळाल्या
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथील लोकप्रतिनिधींना केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही वेगळे महत्त्व प्राप्त होते. साईभक्तांना दर्शनासाठी शिफारस करणे, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग, तसेच शहरातील हॉटेल व्यवसाय, लॉजिंग, प्रसाद विक्री आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांवर अप्रत्यक्ष प्रभाव या सर्व बाबी नगराध्यक्ष पदाच्या महत्त्वात भर घालतात. याशिवाय, वाढती जमीन किंमत आणि रिअल इस्टेट व्यवहारांमुळेही स्थानिक राजकारणाला आर्थिक कंगोरे प्राप्त झाले आहेत.
