राज्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारलीय तब्बल 200 हून अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. 1990 नंतर भाजपनं तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. अशी कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष ठरलाय. तर दुसरिकडे मविआनं सर्वात खराब कामगिरी केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महायुतीच्या मतांचा टक्का वाढलाय तर मविआच्या मतांच्या टक्केवारी कमालीची घट झालीय. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश महायुतीला मिळालाय.
advertisement
महायुतीनं विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतलीय. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असं चित्र आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानलेत. लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत असल्याचं ते म्हणाले. ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं काहीही ठरलं नसून मुख्यमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं वक्तव्य त्यांनी केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील मग निर्णय होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या मुख्यमंत्रीपदावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
2024 च्या निकालाची वैशिष्ट्यं
राज्यात महायुतीची जोरदार मुसंडी
राज्यात महाविकास आघाडीची पीछेहाट
राज्यात भाजपला पुन्हा 100 हून अधिक जागा
1990 नंतर एखाद्या पक्षाला लागोपाट तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा
1990 नंतर अशी कामगिरी करणारा भाजप एकमेव
राज्यात मविआची सर्वात खराब कामगिरी
निकालात भाजपचा स्ट्राईक रेट 85.5%
शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट 70%
राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 62.7%
काँग्रेसचा स्ट्राईक रेट 18.6%
शिवसेना उबाठा स्ट्राईक रेट 20.6%
राष्ट्रवादी (SP)स्ट्राईक रेट 15.1%
काँग्रेसची आजवरची निराशाजनक कामगिरी
शरद पवारांच्या NCPची खराब कामगिरी
शिवसेना उबाठाची आजवरची निराशाजनक कामगिरी
काँग्रेसच्या वाट्याला केवळ 10.64% मतं
महायुतीला आजवरचा सर्वात मोठा जनादेश
महायुतीच्या खात्यात 200हून अधिक जागा
एकट्या भाजपकडे मविआहून अधिक जागा
विकासाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश
निवडणूक पूर्वयुतीला मोठं यश
1972 नंतर सर्वात मोठा जनादेश
महायुतीला 50%हून अधिक व्होट शेअर
