पंतप्रधान जर आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असतील तर त्यांचीही बॅग तपासली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माझी बॅग आता ऑटो चेकिंग मोडवर गेल्याचे दिसते. बॅग दिसली की लगेच तपासली जाते असं बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान सोडून इतर सर्वांच्या बॅगा तपासण्याचे आदेश आहेत. मात्र जर पंतप्रधान आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी येत असतील तर त्यांचीही बॅग तपासली पाहिजे असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार सभेत बोलताना ठाकरे यांनी ही मागणी केली.
advertisement
शेतकरीच काय सर्वांनाच आत्महत्या कराव्या लागतील, उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रामध्ये अमित शहा यांना केंद्रीय सहकार मंत्री केले आहे. मात्र त्या माध्यमातून महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने आजारी पाडायचे आणि कवडीमोल किंमतीत विकत घ्यायचे सुरू झाले आहे. सहकारी बँकांबाबतही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मोदी-शहांच्या हातात सर्व सूत्र जाणार असतील तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र कोलमडून पडेल. तसेच शेतकरीच काय सर्वांनाच आत्महत्या कराव्या लागतील.
महाराष्ट्रात मोदी नाही तर ठाकरे गॅरंटी चालते : उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातील शेतकरी मारतोय आणि तुम्ही माझ्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे पळवताय. मुंबईत मोदींची सभा आहे, त्या सभेच्या बॅनरवर फोटो कुणाचा तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. मोदी मुंबईत आल्यावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर लोळत जातील आणि म्हणणार आम्हाला मतदान करा. मोदींना आता कळले आहे की महाराष्ट्रामध्ये तुमची गॅरंटी चालत नाही. महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालेल असं ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
