आज राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून एक्झिट पोलचे आकडे समोर येणार आहेत.
महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असल्याने दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटाच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे.
advertisement
कुठे पाहाल एक्झिट पोल?
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या सगळ्या अपडेट्स न्यूज 18 मराठीच्या https://news18marathi.com/ वेबसाईटवर एका क्लिकवर वाचता येईल. त्याशिवाय, न्यूज 18 लोकमत या आपल्या वृत्तवाहिनीवरही एक्झिट पोलचा आढावा घेणारा 'पोल ऑफ पोल' पाहता येईल. यावेळी राजकीय नेत्यांसोबत, राजकीय विश्लेषक यांची मते ही प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहेत.
सगळे एक्झिट पोल एकाच ठिकाणी...
विविध संस्थांनी व्यक्त केलेले एक्झिट पोलची आकडेवारी एकाच ठिकाणी 'न्यूज 18 मराठी' या वेबसाईटवर पाहता येईल. त्याशिवाय 'न्यूज 18 लोकमत'वरही देखील सगळे एक्झिट पोलचे अंदाज पाहता येतील. त्यामुळे प्रेक्षक आणि वाचकांना एक्झिट पोलची सगळी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
सोशल मीडियावर पाहा एक्झिट पोल...
न्यूज १८ लोकमत, न्यूज १८ मराठीच्या सोशल मीडिया हँडलवरही एक्झिट पोल पाहता येतील.
- https://www.youtube.com/@News18LokmatTV
- https://news18marathi.com/live-tv/
- https://www.facebook.com/News18Lokmat
