TRENDING:

Maharashtra Elections Amit Thackeray : CM शिंदेंना भेटले अन् राज ठाकरेंनाही भेटणार, सदा सरवणकरांचा निर्णय काय?

Last Updated:

Maharashtra Elections Sada Sarvankar : सदा सरवणकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता सदा सरवणकर हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मुंबईतील माहिम मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता सदा सरवणकर हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अगदी तासाभराचा वेळ असतानाही सदा सरवणकर यांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे.
CM शिंदेंना भेटले अन् राज ठाकरेंनाही भेटणार, सदा सरवणकरांचा निर्णय काय?
CM शिंदेंना भेटले अन् राज ठाकरेंनाही भेटणार, सदा सरवणकरांचा निर्णय काय?
advertisement

माहिममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले आहेत. तर, सदा सरवणकर देखील शिंदे गटाकडून उमेदवार आहेत. शिवसेना ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी सातत्याने भाजपकडून मागणी होत आहे. इतकंच नाहीतर भाजप अमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील सरवणकरांनी माघार घ्यावी अशी मागणी केली आहे. त

advertisement

सदा सरवणकरांनी काय म्हटले?

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीतून आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी माहिम मतदारसंघातून माघार घेतल्यास अमित ठाकरे निवडून येणार का, असा सवाल त्यांनी केला. अमित ठाकरे हे निवडून येतील अशी कोणतीही स्थिती मतदारसंघात नसल्याचेही सरवणकर यांनी म्हटले. या मतदारसंघातील राजकीय समीकरणे सांगण्यासाठी आपण राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले.

advertisement

माहिममध्ये हायव्होल्टेज लढत!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

दादर माहिम मतदारसंघात शिवसेना भवन असल्याने येथील विजय पराजयाला वेगळेच महत्व आहे. शिवसेनेवर दावा सांगितल्यानंतर आणि पक्षासह चिन्ह देखील मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना भवन असलेल्या दादर माहिम मतदारसंघात तीन टर्मचे आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. दुसरीकडे दादर माहिम जिंकण्यासाठी विभागप्रमुख महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी रिंगणात उतरवले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Amit Thackeray : CM शिंदेंना भेटले अन् राज ठाकरेंनाही भेटणार, सदा सरवणकरांचा निर्णय काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल