महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आता पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलैदरम्यान होणार आहे. तर तर दहावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ही परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात घेतली जाते. पण कोरोनामुळे बोर्ड परीक्षांचं बिघडलेलं वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून यंदाची पुरवणी परीक्षा जूनमध्ये घेतली जाणार आहे.
advertisement
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले, एटीकेटी प्राप्त विद्यार्थी, श्रेणीत सुधार करू इच्छिणारे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. नियमित परीक्षेप्रमाणे पुरवणी परीक्षादेखील यंदा लवकर होत आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणारी पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्ये सुरू होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक https://www. mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले.