TRENDING:

HSC Results 2025 : काही तासांचीच प्रतिक्षा! बोर्डाच्या वेबसाइटशिवाय बारावीचा निकाल कुठं पाहता येणार? वाचा एका क्लिकवर

Last Updated:

Maharashtra Board HSC Results 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेचा निकाल आज, 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. त्यापूर्वी शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेचा निकाल आज, 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. त्यापूर्वी शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाशिवाय इतरही काही वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहेत.
काही तासांचीच प्रतिक्षा! बोर्डाच्या वेबसाइटशिवाय बारावीचा निकाल कुठं पाहता येणार? वाचा एका क्लिकवर
काही तासांचीच प्रतिक्षा! बोर्डाच्या वेबसाइटशिवाय बारावीचा निकाल कुठं पाहता येणार? वाचा एका क्लिकवर
advertisement

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, 75 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. 60 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. 45 टक्के ते 59 टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी 35 पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.

advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेत एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता  निकाल पाहण्यासाठी आपला रोल नंबर आणि आईचे नाव (मूल प्रमाणपत्रानुसार) आवश्यक असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर, आपली डिजिटल गुणपत्रिका DigiLocker वरून डाउनलोड करता येईल

advertisement

>> बारावीचा निकाल कसा पाहायचा? (Step-by-step Process)

1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

2. ‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा

3. तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका

4. ‘View Result’ बटणावर क्लिक करा.

>> महाराष्ट्र बोर्डासह कोणत्या वेबसाइटवर पाहता येईल निकाल?

बारावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डासह इतरही काही वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. तुम्ही निकाल पाहण्यासाठी पुढील वेबसाइटचा वापर करू शकता.

advertisement

> https://mahahsscboard.in 

> http://hscresult.mkcl.org 

> https://results.digilocker.gov.in 

> https://results.targetpublications.org 

> https://results.navneet.com 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
HSC Results 2025 : काही तासांचीच प्रतिक्षा! बोर्डाच्या वेबसाइटशिवाय बारावीचा निकाल कुठं पाहता येणार? वाचा एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल