TRENDING:

कर्जमाफीच्या घोषणेवर संताप, निकष स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Last Updated:

राज्यातील बळीराजा ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता, ती शेतकरी कर्जमाफीची घोषणा अखेर राज्य सरकारने शुक्रवारी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर निकषांची स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफीची घोषणा करण्यापूर्वी सरकारने शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून सविस्तर अभ्यास करायला हवा होता, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जळगाव- शेतकरी नाराज
जळगाव- शेतकरी नाराज
advertisement

राज्यातील बळीराजा ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता, ती घोषणा अखेर राज्य सरकारने शुक्रवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. या कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.

कर्जमाफी जाहीर करताना निकष स्पष्ट न केल्याने शेतकरी संतप्त

कर्जमाफी जाहीर करताना निकष स्पष्ट न केल्याने शेतकरी संतप्त झाले असून, इंग्रजांनी जसे निर्णय भारतीय जनतेवर लादले तसेच सरकार शेतकऱ्यांवर निर्णय थोपवत असल्याची टीकाही काही शेतकऱ्यांनी केली आहे.

advertisement

कर्जमाफी देण्यापेक्षा शेतमालाला योग्य हमीभाव द्या

दरम्यान, कर्जमाफी देण्यापेक्षा शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. शेतमालाला योग्य भाव मिळाला तर कर्जमाफीसाठी सरकारकडे जावे लागणार नाही, असे मतही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले. तसेच कर्जमाफीचे निकष तयार करताना जाणीवपूर्वक कमी शेतकरी पात्र ठरतील अशा पद्धतीने निकष तयार केले जातात, असा आरोपही शेतकरी वर्गातून करण्यात आला आहे.

advertisement

कर्जमाफी जाहीर करताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

-राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आगीत सगळं जळून खाक झालं, तरी हरला नाही कल्पेश, आता जोमाने सुरू आहे व्यवसाय
सर्व पहा

-३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कर्जमाफीच्या घोषणेवर संताप, निकष स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल