विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबरला लागला होता.हा निकाल लागून 4 दिवस उलटायला आले आहेत,तरीही राज्यात महायुतीच सरकार स्थापण झालं नाही आहे. त्यात भापजकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव चर्चेत आणि एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू आहे. या सर्व घडामोडीत आता मुख्यमंत्रीपदावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
advertisement
खरं तर देवेंद्र फडणवीस आधी संभाजीनगरला जाणार आहेत. एका खाजगी समारंभासाठी ते संभाजीनगरला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नागपूरला एका कार्यक्रमाला जाणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदावर तोडगा काढण्यासाठी ते दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती राजकीय सुत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे कदाचित 24 तासात कदाचित मुख्यमंत्रीपदावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
या सगळ्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील आणि सुहास कांदे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यासाठी हे आमदार फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्याची माहिती आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद कुणाला मिळतं? आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती मंत्रिपदे येतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तसेच भाजपने शिवसेना शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. दोन्हीपैकी एकाची निवड करा, असा निरोप भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे यांचही नाव चर्चेत आहे. आता, भाजपच्या ऑफरवर एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
