संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलतान संजय राऊत यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. तीन पक्षांच्या युतीला सैतानी बहुमतं मिळालं आहे. भाजपाला मित्र पक्ष मिळुन 140 जागा मिळाल्या आहेत. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या आहेत, हे दिल्लीतील वाटरलेल्या डोळ्यांना घाबरले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
advertisement
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या पेचावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना केंद्रात गृहमंत्री, भविष्यात पंतप्रधान करतो असं आश्वासन भाजपने दिलं असावं.त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा बनेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. पण भाजपचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. त्यांची भूमिका युज अँड थ्रो असते. त्यांनी फिरवलेल्या शब्दाचा सगळ्यात मोठा बळी आमची शिवसेना ठरली आहे. तसेच भाजप कधीच नैतिकता पाळत नाही,अशी टीका देखील राऊतांनी भाजपवर केली.
ईव्हीएमवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल कोर्टाने सांगितले की तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही ही चुकीची माहिती आहे. आम्ही मागच्या 10 वर्षात जिंकलो तरी आणि हरलो तरी निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या असं म्हणत आहोत.
