महायुतीचा शपथविधी सोहळा हा येत्या गुरवारी 5 डिसेंबर 2024 ला आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी भव्य दिव्य तयारी सध्या सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यात पहिल्या टप्प्यात 25 ते 27 जणांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या नेत्यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या शपथविधीचे निमंत्रण हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेश उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या भाजपशासीत राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. एनडीए ते मित्रपक्षाचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनाही शपथविधीच निमंत्रण दिलं गेलं आहे.
advertisement
विशेष म्हणजे भाजपची स्टार कॅंपेनर खासदार कंगना रणावत ही शपथविधीला उपस्थित राहणार आहे. यासह राष्ट्रीय - राज्य पातळीवरील संत, महंत आणि धर्मगुरू शपथविधी सोहळ्याला खास उपस्थित असणार आहे. बॅालिवूडमधील अनेक मान्यवर देखील या शपथविधीला येणार आहे.तसेच राज्यभरातून भाजपचे १५ हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते शपथविधीला सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान एकीकडे शपथविधीची जय्यत तयारी सूरू आहे. पण मुख्यमंत्री कोण असणार आहे? याबाबत अद्याप अस्पष्टता आली नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर काय बोलले?
महायुतीच सरकार स्थापन होणार आहे.यामध्ये कुठलीच आडकाठी येणार नाही. आमच्या तीन पक्षांमध्ये समन्वय आहे. आणि आम्हाला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.तसेच महायुतीची शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे,स्थळही ठरलंय पण मुख्यमंत्री जाहीर झाला नाही. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, भाजपची उद्या विधी मंडळ पक्षाची मिटींग आहे. ही बैठक झाल्यावर सगळ स्पष्ट होईल.त्यामुळे चिंता करू नका, असे शिदेंनी यावेळी सांगितले आहे.
