महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरूवारी दिल्लीत अमित शाहांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला आहेत.तसेच त्यांनी मागितलेलं गृहखात देण्यास हायकमांडचा विरोध आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा पेच वाढतच चालला आहे.
या बैठकीनंतर पुन्हा भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीज-वजाबाकी या बैठकीत करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळेच मराठा समाज आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहांनी आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
या बैठकीनंतर मराठा मु्ख्यमंत्री म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आले आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून प्रचंड मतांनी निवडून आलेले मुरलीधर मोहोळ हे नवनिर्वाचीत खासदार आहेत. मोहोळ आता खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले आहे.त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी अचानक मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
मुरलीधर मोहोळ या चर्चेवर काय म्हणाले?
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे,असे मोहोळ यांनी एक्सवर म्हटलं आहे.
दरम्यान मुरलीधर मोहोळ जरी असे म्हणत असले तरी केंद्रीय नेतृत्व याबाबत काय विचार करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
