पवारांच्या निवृत्तीबाबत रोहित काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगावमध्ये आले होते. जाहीर सभा संपल्यानंतर रोहीत पवार यांनी म्हटले की, शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याचा नेमका अर्थ काय निघतो हे त्यांनाच माहिती आहे. शरद पवारांनी 55 ते 60 वर्ष लोकांची सेवा केली. अशात पवारांनी एक वेगळा विचार केलेला असावा पण जोपर्यंत ते स्पष्ट बोलत नाहीत तोपर्यंत ते कळणार नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. या वयात सुद्धा स्वतः शरद पवार हे दिवसाला तीन ते चार सभा घेत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार या राज्यात कसे येणार यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.
advertisement
तुमचे नेते मतदारसंघ सोडत नाहीत, अजित पवार गटावर टीका...
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली. रोहित यांनी म्हटले की, तुमचे नेते यापूर्वी महाराष्ट्रात फिरू शकत होते. पण, आता त्यांना स्वत:चा मतदारसंघ सोडवत नाही. या आधी शरद पवारांसोबत असताना तुमचे नेते यापूर्वी महाराष्ट्रात फिरत होते. प्रचारासाठी राज्य पिंजून काढत असे. आता त्यांच्याकडून आता स्वत:चा मतदारसंघ सोडवत नाही. अनिल पाटील यांचे नेते बाहेर फिरू शकत आहेत का? का ते त्यांच्या मतदारसंघात अडकून बसलेले आहेत असे टीकास्त्र रोहित पवारांनी सोडले.
