महायुतीत मुख्यमंत्रीपदावर सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सूरू आहे. त्यात भाजप शिवसेनेमध्ये अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याचीही चर्चा आहे. या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.
बहुमताचा आकडा मोठा आहे म्हणूनच सरकार स्थापन होत नाहीये. आता एकनाथ शिंदे यांना कळेल की भाजप काय आहे. जेव्हा शिवसेनेचे सरकार होतं तेव्हा मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते मात्र देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शिवसेना उपमुख्यमंत्री पद देखील दिले नाही. आता अडीच वर्षाचा फार्मूला जो पुढे येतोय हाच फार्मूला शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठरवला होता मात्र तेव्हा तो पाळला नाही. आता मात्र एकनाथ शिंदे यांना तो स्वीकारावा यासाठी वातावरण तयार केले जात आहे. आता एकनाथ शिंदेने यांनी गुवाहाटीला जावे,असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
advertisement
2019 ला जेव्हा आम्ही अडीच अडीच वर्ष फॉर्म्युला सांगत होतो. तेव्हा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्मुला मान्य केला असता तेव्हा पुढल्या अनेक घडामोडी उतरल्या असत्या पण फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता पक्ष फोडायचा होता म्हणून हा तेव्हा अडीच वर्षाचा 2019 फॉर्म्युला पाळला नाही आणि आता ते सर्व काही करायला तयार आहेत ह्याच्यात लक्षात घ्या महाराष्ट्र विषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे,असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते.
