विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला होता. यातल्या 132 जागांवर भाजपचा, 57 जागांवर शिवसेनेचा तर 41 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. महायुतीच्या या विजयामागे लाडकी बहीण, ओबीसी फॅक्टर असल्याचे बोलले जातंय. असं जरी असलं तरी महाराष्ट्रात महायुतीच सरकार खेचून आणण्यात अनेक नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय संघटनेचे महामंत्री शिव प्रकाश, सुनील देवधर,प्रभारी भूपेंद्र यादव, केके उपाध्याय या नेत्यांचा समावेश होतो. याच नेत्यांनी महाराष्ट्रात महायुतीला जिंकवण्यासाठी पडद्यामागून सुत्र फिरवली होती
advertisement
शिव प्रकाश यांना निवडणुकीत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. मध्यप्रदेश निवडणुकीच्या वेळेस राज्यात भाजपच सरकार येणार नाही, असे बोलले जात होते. मात्र शिव प्रकाश यांनी अशा परिस्थितीत मध्यप्रदेशमध्ये भाजपच सरकार आणून दाखवलं होतं. मध्यप्रदेश सोबत त्यांनी छत्तीसगढ, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच त्यांनी आरएसएस आणि भाजपमध्ये समन्वयकाच काम केले आहे.
मुळचे उत्तरप्रदेशच्या मुरादाबादचे असलेले शिवप्रकाश आधी आरएसएसचे क्षेत्र प्रचारक होते. भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर देखील आरएसएसोबत जोडलेले होते. तसेच ते आपल्या राजकीय कौशल्याच्या बळावर नाराज कार्यकर्त्यांना पटवण्यात माहिर आहेत. याची झलक त्यांनी विधानसभेच्या तिकीट वाटपातही दाखवून दिली होती.
केंद्रीय मंत्री निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी देखील महाराष्ट्र निवडणुकीत पडद्यामागून काम केलं होतं. भाजप कार्यालयात सतत बैठका घेतल्या कारणाने ते अनेकांच्या संपर्कात राहिले होते. तसेच सुनील देवधर यांनी त्रिपुरामधील 20 वर्ष जुन्या मार्क्सवादी पाटी सरकारला पराभवाच पाणी पाजलं होतं.
