संजय शिरसाट माध्यमांशी बोलत होते. खरं तर मुख्यमंत्री भाजपकडून देवेंद्र फडणवीसांची नाव आघाडीवर आहे. त्यात संजय शिरसाट यांनी राज्याचा मुख्यमंत्री कोण? याच उत्तर अद्याप कोणालाच सापडलं नाही. म्हणून राजकारणात काय सुरू आहे का कोण CM होणार यावर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, सरकार स्थापन करण्यात माझा अडसर नाही,असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी परखडपणे सांगितलं आहे. तसेच वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे, पक्ष आणि मी बांधील असल्याचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं आहे. दिल्लीतल्या बैठकीत देखील त्यांनी ते सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे?कुणाला मुख्यमंत्री करावं, हा निर्णय मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा, असे शिरसाटांनी म्हणत, का वेळ लागतोय याची कल्पना नाही?
advertisement
संजय शिरसाट यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे गावी का जात असतात. यामागचे कारण देखील सांगितले आहे. दरेगाव त्यांच आवडीच ठिकाण आहे. आणि मोठा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री दरे गावी जात असतात? असे खळबळजनक विधान संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे का दरेगावला गेले याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही लाचारसारख नाटक करणारी लोक नाही. आमची नाराजी आम्ही उघडपणे जाहीर करू, अशा इशारा शिरसाटांनी भाजपला दिला आहे.
