राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement
निवडणूक कार्यक्रम कसा असणार?
-अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५
-अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
-छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५
-माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५
-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५
-मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५
-मतमोजणीचा दिवस-३ डिसेंबर २०२५
निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसतील
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
