राज्य पोलिस दल आणि कारागृह विभागातील शिपाई अशा दोन पदांसाठी पोलीस विभागात मेगाभरती केली जाणार आहे. एकूण 15631 पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. 30 नोव्हेंबर असलेल्या तारखेला आता मुदतवाढ मिळाली आहे. पोलीस विभागाच्या नोकरभरतीसाठी 7 डिसेंबर 2025 ही आता अखेरची तारीख असणार आहे. त्यामुळे अजूनही ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज नसेल भरला, तर तुम्ही अर्ज भरू शकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अडचणी येत होत्या. त्यामुळे गृह मंत्रालयाने अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज न भरलेल्या उमेदवारांसाठी हा दिलासाच आहे.
advertisement
पोलीस शिपाई पदासाठी 12399 रिक्त जागा, पोलीस शिपाई चालक पदासाठी 234 रिक्त जागा, बॅण्डस्मन पदासाठी 25 रिक्त जागा, सशस्त्र पोलीस पदासाठी 2393 रिक्त जागा आणि कारागृह शिपाई पदासाठी 580 रिक्त जागा अशा एकूण 15631 जागांसाठी नोकरभरती केली जात आहे. अनेकांचं खाकी वर्दीचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. 29 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेली अर्जप्रक्रिया आता 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री ठीक 11.59 वाजेपर्यंत होणार आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 च्या रात्री 11.50 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस विभागांमध्ये एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जर अर्जदारांनी एकाच वेळी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरला असेल, ऑनलाईन अर्ज भरताना ही गोष्ट विचारात घेऊनच अर्ज भरावा. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे व्यवस्थित विचार करूनच अर्ज भरावा. उमेदवार एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच विभागामध्ये अर्ज करु शकणार आहे. एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील. या भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी policerecruitment2025 pdf या लिंकवर क्लिक करा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातांचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना/ पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरावा.
