जयंत पाटील यांनी म्हटले की, निवडणुकीत आम्ही 'इंडिया आघाडी'त होतो. डाव्या पक्षांच्या मतांमुळे 'इंडिया'चे महाराष्ट्रात 31 खासदार निवडून आले. आम्ही प्रामाणिकपणे काम केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. परंतु विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आम्हाला मदत केली नाही. मित्रपक्षांनी दगा दिला, त्यामुळे आमचा पराभव झाला, अशा शब्दात भाई जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली.
advertisement
शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा अलिबाग येथील 'पीएनपी' नाट्यगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पाटील यांनी इंडिया आघाडीतील पक्षांवर पराभवाचे खापर फोडले.
विधानसभा निवडणुकीत डाव्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीने महाविकास आघाडीकडे 20 जागांची मागणी केली होती. मात्र, मविआने एवढ्या जागा सोडण्यास नकार दिला. त्याच्या परिणामी काही मोजक्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. तर, दुसरीकडे जी जागा शेकापला सोडण्यात आली, त्यातील काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या. रायगडमधील बालेकिल्ल्यात शेकापला अपयशाला सामोरे जावे लागले. सांगोला ही एकच जागा शेकापला जिंकता आली.
