दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह ६ ठिकाणी निकाल पाहता येईल. दहाविच्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण ऑनलाइन निकालात पाहता येतील. तसंच निकालीची छापील प्रतही विद्यार्थ्यांना मिळू शकेल. https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर माहिती सविस्तर उपलब्ध होईल. शाळा आणि संस्थांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे.
advertisement
कुठे बघायचा निकाल?
- https://mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://results.targetpublications.org
कसा बघायचा निकाल -
सगळ्यात आधी mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
यानंतर होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमच्या लॉगिन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव ही सगळी माहिती भरा
यानंतर स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईल
हा निकाल पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोडही करू शकता
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर, कोकण पुन्हा अव्वल, मुलींची बाजी
ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.
