टिपरेश्वरमधून वाघ धाराशिवच्या जंगलात
पाचशे किलोमीटरचे अंतर कापत यवतमाळच्या टिपरेश्वरमधून आलेला वाघ धाराशिवच्या जंगलात चांगलाच रमला आहे. पण दिवसेंदिवस शिकारीपोटी हा वाघ जंगल सोडून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करत आहे. एक दिवसाआड म्हणजेच त्याने आत्तापर्यंत 50 चा वर शेतकऱ्यांची जनावर फस्त केली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वन विभागाच्या विशेष पथकाला हा वाघ पकडण्याचे आदेश दिले असले, तरी तो अद्याप हाती लागलेला नाही.
advertisement
वनविभागाचं आश्वासन
रोज नवीन युक्त्या करून वाघ पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः त्याला आकर्षित करण्यासाठी जंगलात शिकार ठेवली असून त्यावर कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वन विभागावर विश्वास ठेवा लवकरच त्याला जेरबंद करू, असा विश्वास वनविभागाचे कर्मचारी व मोहिमेत सहभागी अधिकारी देत आहेत.
डोंगर रांगात वाघ रमला
या वाघाने धाराशिवचे येडशी भूम परंडा आणि जामखेडचा काही भाग तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात वावर वाढवला आहे. दुष्काळी भागाचा या डोंगर रांगात वाघ रमला खरा पण त्याच्या या वावरामुळे शेतकऱ्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शेतकरी जनावर सांभाळताना देखील हातात कुऱ्हाडी काठी घेऊनच फिरत आहेत त्याचा बंदोबस्त करावा व अशी मागणी करत आहेत. तर अधिकारी मात्र कोणी नेत्यांनी विचारू द्या, एकच उत्तर ठरलेलं असून लवकरच त्याला पकडून एवढेच बोलत आहेत.
ऑपरेशन टायगर
दरम्यान, राज्याच्या राजकारणात "ऑपरेशन टायगर" यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असताना, धाराशिवमधील या वाघाला पकडण्याचे ऑपरेशन कधी यशस्वी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.