TRENDING:

गडचिरोलीत मोठी चकमक, 25 लाख रुपयांचे बक्षीस नावावर असलेल्या माओवादी नेत्यासह सात जण ठार

Last Updated:

घटनास्थळावरून नक्षलवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली असून दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महेश तिवारी, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यात 24 तासापासून सुरू असलेल्या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या 7 झाली आहे. दरम्यान 25 लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल माओवादी प्रभाकरचा ही चकमकीत मृत्यू झाला आहे. आज सकाळपर्यंत तीन माओवादी ठार झाले होते. शोधमोहिमेत आणखी चार माओवाद्यांचे मृतदेह सापडले असून ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या सात झाली आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे तर एक जवान जखमी आहे.

advertisement

दरम्यान या चकमकीत माओवाद्याच्या गडचिरोली विभागीय समितीचा प्रमुख, माओवाद्यांच्या सब झोनल ब्युरोचा प्रमुख आणि कंपनी 10 चा प्रभारी प्रभाकर ही ठार झाला आहे. त्याच्यावर दोन राज्यांचा मिळून 50 लाख रुपयाच बक्षीस आहे. प्रभाकर हा मूळचा तेलंगणातल्या कामा रेड्डी येथील रहिवासी असून अनेक वर्ष माओवादी चळवळीत सक्रिय सक्रिय आहे.

दीपक मडावी शहीद

advertisement

माओवाद्यांच्या हल्ल्यात दीपक मडावी शहीद झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यात जोगा मडावी हा सी सिक्सटी कमांडोचा जवान जखमी झाला असून त्याला आज बाहेर काढून हेलिकॉप्टरने उपचारासाठी गडचिरोलीला आणण्यात आले आहेय अजूनही या भागात सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली. गुरुवारी दिवसा झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर आज सकाळपासून सी-60 पथकासह केंद्रीय राखीव पोलिस दल व जलद प्रतिसाद पथकाने संयुक्तपणे पुन्हा नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली.

advertisement

आतापर्यंत किती माओवादी ठार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

2025 मध्ये जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये 163 माओवादी ठार झाले, तर 2026 मध्ये आतापर्यंत 11 माओवादी ठार झाले आहेत. जानेवारी 2024 पासून आतापर्यंत जिल्ह्यात 232 नक्षलवादी ठार झाले, 1163 जणांना अटक करण्यात आली आणि 888 नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गडचिरोलीत मोठी चकमक, 25 लाख रुपयांचे बक्षीस नावावर असलेल्या माओवादी नेत्यासह सात जण ठार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल