TRENDING:

तिघांचा प्लॅन, तिघांनी पाठलाग करून मारलं, खोपोलीत नगरसेविकाच्या पतीच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, 10 जणांवर गुन्हा

Last Updated:

रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळं खळबळ उडालीय. या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय हत्या कशी झाली? याचा घटनाक्रम देखील समोर आला आहे.
News18
News18
advertisement

मंगेश काळोखेंची हत्या कुणी केली? कुणावर आरोप

खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊंसर आणि इतर तीन अनोळखी लोकांचा समावेश आहे. खोपोली पोलिसात सर्वजणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मंगेश काळोखेंच्या हत्येचा कट कुणी रचला?

सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी खुनाचा कट रचला असल्याचं FIR मध्ये स्पष्ट म्हटलं आहे. आरोपी दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी मंगेश यांना पाठलाग करून खाली पाडले आणि इतर तीन जणांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून मंगेश काळोखे यांची हत्या केली. निवडणुकीत झालेला पराभव, राजकीय वाद, आणि पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. रात्री उशिरा मंगेश काळोखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

advertisement

मंगेश काळोखेच्या मामेभावाने काय आरोप केला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

मंगेश काळोखे याचे मामेभाऊ म्हणले, खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि आरोपी यांची सांगड आहे. आम्हांला धोका आहे, अशी कल्पना माझा आतेभाऊ मंगेश काळोखे आणि त्याचा पुतण्या यांनी पीआय हिरे यांना दिली होती. मात्र पीआय सचिन हिरे यांना माहिती देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. सचिन हिरे यांचे वागणे अतिशय संशयास्पद आहे. सचिन हिरे यांचे निलंबन करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मंगेश काळोखे यांचे मामे भाऊ यांनी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तिघांचा प्लॅन, तिघांनी पाठलाग करून मारलं, खोपोलीत नगरसेविकाच्या पतीच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, 10 जणांवर गुन्हा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल