गेल्या अनेक दिवसापासून 'वेट अँड वॉच'वर असलेले मनोहर शिंदे याचे भाजपाशी टायमिंग जुळलं आहे. मात्र अद्याप मुहूर्त ठरेना अशी स्थिती आहे. परंतु येत्या काही दिवसात त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
शिंदे-अजितदादांकडे जाण्याची चाचपणी, अखेर फडणवीस यांच्या भेटीने भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मलकापूर नगरपरिषद 2009 साली अस्तित्वात आली असून तेव्हापासून काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या नगर परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. तसेच माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी या नगर परिषदेत काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोहर शिंदे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर शिंदे शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीची ही चाचपणी केली. मात्र, आज दिवसभर ते मुंबईत ठाण मांडून आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
advertisement
नगरपरिषदेचा निवडणुका जाहीर होताच काँग्रेसला धक्का
मनोहर शिंदे यांच्या या भेटीमुळे काँग्रेसला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे. आजच नगरपरिषदेचा निवडणुका जाहीर होत असताना काँग्रेसला हा धक्का बसल्याने मलकापूर नगरपरिषदेत भाजपाचे वर्चस्व राहील असे बोलले जात आहे.
निधीसाठी भेट असल्याच्या चर्चा पण राज की बात कराडकरांना माहिती
साताऱ्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मोठे राजकारण पाहायला मिळते. मात्र आजची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मलकापूरला निधी मिळावा. यासाठी असल्याचे आता सांगण्यात येत आहे. परंतु आता कराडकर ही भेट नक्की कशासाठी आहे हे जाणून आहेत.
