TRENDING:

तुझे परळीपासून मुंबईपर्यंत मॅटर, धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको, मनोज जरांगे का आक्रमक झाले?

Last Updated:

Jalna Morcha: दिवंगत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या जनतेचा मोर्चा जालन्यात पार पडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : आरोपींची बाजू घेऊन काढण्यात येणारे प्रतिमोर्चे थांबवा नाहीतर महाराष्ट्रात असाच पायंडा पडेल, अशी भीती व्यक्त करून संतोषभैय्याचा खून करून पोट भरलं नाही का? असा सवाल करीत धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे
धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे
advertisement

दिवंगत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या जनतेचा मोर्चा जालन्यात पार पडला. या मोर्चाला भाजप आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबीय, मनोज जरांगे आणि हजारोंच्या संख्येने विविध समाज घटक उपस्थित होते.

धनंजय मुंडेंना सुट्टी नाही, जरांगे आक्रमक

मोर्चानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावरील प्रश्नाला जरांगे पाटील यांनी अतिशय आक्रमक उत्तर दिले. लाभार्थ्यांची टोळी उठवून, त्यांना बोलायला लावून धनंजय मुंडे यांनी चुकीचे काम केले. माझ्या नादी लागू नको, असे त्यांना बजावून सांगितले होते. परंतु ते माझ्या नादाला लागलेच. आता त्यांना सुट्टी नाही, त्यांचे परळीपासून मुंबईपर्यंत मॅटर आहेत. कायद्याच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे बघेन, असे जरांगे म्हणाले.

advertisement

महाराष्ट्रासारख्या राज्यात आरोपींना समर्थन द्यायला मोर्चे काढावेत?

निर्घृण हत्या झाल्यानंतर आरोपींची बाजू घेऊन समर्थनार्थ मोर्चे काढायचे, हा पायंडा साफ चुकीचा आहे. उद्या असे खून झाले आणि असेच मोर्चे निघायला लागले, तर महाराष्ट्राला आपण काय सांगू पाहतोय? महाराष्ट्रासारख्या राज्यात आरोपींना समर्थन द्यायला मोर्चे काढावेत? हे साफ चुकीचे असल्याचे जरांगे म्हणाले.

मोर्चानंतर जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

जालना येथे मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा होता. या मोर्च्यात मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खखालावल्याने आणि थकवा जाणवत असल्याने त्यांनी भाषण टाळले. मोर्चानंतर त्यांना उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप चावरे यांनी जरांगे पाटील बीपी कमी आहे, पाठदुखीचा त्रास आहे, त्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन करण्यात येणार आहे. रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर पुढचे उपचार केले जाणार असल्याचे सांगितले. त्रास जाणवतोय, अस्वस्थता वाटतेय पण मी शनिवारी धाराशिवच्या मोर्चाला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुझे परळीपासून मुंबईपर्यंत मॅटर, धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको, मनोज जरांगे का आक्रमक झाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल