मनोज जरांगे यांनी डॉक्टरांनी एक महिना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारला माझी विनंती आहे 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करायला हवी. GR निघाला आहे अंमलबजावणीलाही लवकर सुरुवात करा. नोंदी सापडलेल्यांना लवकर प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, सरकारने यामध्ये आता बदल करू नये, 17 सप्टेंबर पर्यंत प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे असं जरांगे यांनी विनंती केली आहे.
advertisement
'...तर तुमच्या मुळावर उठणार, 1994 च्या जीआरला करणार चॅलेंज', मनोज जरांगेंचं भुजबळांना इशारा
तर त्याच वेळी सरकारला 17 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. जर सरकारने प्रमाणपत्र दिलं नाही तर पुन्हा नाईलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल असं जरांगे पाटील म्हणाले. 17 सप्टेंबर नंतर जरांगे पाटील पुन्हा रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले आहेत. प्रकृती डाऊन असल्य़ाने जरांगे यांना तीन दिवस उपचारासाठी रुग्णालयात ठेवलं होतं. त्यानंतर एक महिना आराम करण्याच्या सूचना दिल्या असतानाही डॉक्टरांचा सल्ला न ऐकता त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil : '...तर दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल', जरांगेंची सरकारला दिली डेडलाइन
मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सकाळी 11 वाजता डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पहिले उपोषण सुरू झाले होते त्या अंतरवली सराटीमध्ये दर्शन घेतलं. सध्याकाळी 4 वाजता ते नारायण गडावर जाणार दर्शनासाठी जाणार आहेत. तूर्तास तरी कुठलेही आंदोलन आणि उपोषण करणार नसल्याचे जरांगे पाटील यांचे संकेत दिले आहेत. मात्र 17 तारखेनंतर मैदानात पुन्हा उतरण्याचे संकेत दिले आहेत.