Manoj Jarange Patil : '...तर दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल', जरांगेंची सरकारला दिली डेडलाइन

Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी राज्य सरकारला डेडलाइन दिली आहे.

'...तर दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल', जरांगेंनी सरकारला दिली डेडलाइन
'...तर दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल', जरांगेंनी सरकारला दिली डेडलाइन
अविनाश कनाडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाल कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा मनोज जरांगे पाटील यांनी पुनरुच्चार केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज होताच पुन्हा एकदा सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी राज्य सरकारला डेडलाइन दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईतील आंदोलनात राज्य सरकारने तीन गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर सहमती दर्शवली होती. मुंबईतील आंदोलनानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सरकारने जीआर काढला आहे, आता अंमलबजावणी देखील करा असेही त्यांनी म्हटले.
advertisement

जरागेंची सरकारला डेडलाइन...

मनोज जरांगे यांनी 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली पाहिजे अशी मागणी करत डेडलाइन दिली आहे. जीआर काढला आहे तर त्याची अंमलबजावणी करा आणि नोंदी सापडल्यांना लवकर प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा अशी मागणी त्यांनी केली. सरकारने यामध्ये आता बदल करू नये. 17 सप्टेंबर पर्यंत प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे, नाहीतर मला पुन्हा नाईलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटले. नोंदी सापडल्यावर जर प्रमाणपत्र द्यायला सुरुवात नाही झाली तर दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला.  मराठा समाजाच्यावतीने बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील निर्णायक टप्प्यानंतर हा दसरा मेळावा होत असल्याने सगळ्यांचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.
advertisement

मराठवाड्यातील 100 टक्के मराठा ओबीसीमध्ये...

मनोज जरांगे यांनी सांगितले की, 100 टक्के मराठ्यांना प्रमाणपत्र मिळणार याची मला गॅरंटी आहे. आपला विजय खूप लोकांना पचत नाही. काही लोक आता प्रश्न उपस्थित करत आहेत. शब्द चुकला काही झाले तर ते दुरुस्त करण्याचे काम सरकारचे आहे आमचे नाही असेही जरांगे यांनी म्हटले.
नोंद नसलेल्या मराठ्यांना सुद्धा गॅझेट नुसार प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि ते द्यायला सुरुवात करा अशी मागणी त्यांनी केली. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले जाणार नसल्याचे कोणीही म्हणत असले तरी आता या नोंदीनुसार आता मराठवाड्यातील सगळा मराठा समाज आता ओबीसीत जाणार असल्याचा दावा जरांगे यांनी दिला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : '...तर दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल', जरांगेंची सरकारला दिली डेडलाइन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement