जातनिहाय जनगणनेचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी स्वागत केले आहे. ओबीसी समाज जास्त आरक्षण घेत होता. जातनिहाय जनगणनेने खरा आकडा समोर येऊन मराठ्यांना आरक्षण मिळेल, आमच्या पोरांचे कल्याण होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.
कुणबी लिहायला लाज कसली वाटते?
जातनिहाय जनगणनेच्या फॉर्मवर कुणबी लिहायला लाज वाटणार नसल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलीये. त्याचबरोबर मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेच्या अर्जावर कुणबी लिहायला लाज वाटणार नाही. मराठा कुणबी पण लिहू शकता. आपण छत्रिय मराठा आहोत. आपण युद्धकाळात लढाया केल्या आहेत. गेली शेकडो वर्षे शेती करतोय. शेती करणारे कुणबी. मराठे आणि कुणबी एका अर्थी एकच आहेत, ते वेगळे नाहीत. मात्र जनगणनेचा अर्ज आणि त्याचा उद्देश बघितल्यानंतरच मराठा समाजाला आवाहन करीन, असे जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
advertisement
जातनिहाय जनगणनेने नेमकं काय होईल?
जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे सर्व समाज घटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल, अशी भावना सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाज घटकांचा शैक्षणिक, आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय वेगाने साध्य करता येईल, अशा सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.