मनोज जरांगे पाटील मंगळवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा, आरक्षणासाठीचे नियोजित पुढील आंदोलन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा समाजाचे महत्त्व अशा प्रश्नांवर जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आंतरवली सराटीची पुनरावृत्ती करू नका, जड जाईल
आम्ही ओबीसीत आहोत याचे पुरावे दिले आहेत. तरी देखील फडणवीस टाळाटाळ करत असतील तर मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येत नसते, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे तसेच मोर्चापूर्वी दबाव आणून आंदोलकांना अटक करणे, लाठीचार्ज करणे ह्या गोष्टी करू नका. आंतरवली सराटीची पुनरावृत्ती करू नका. तुम्हालाच नाही तर थेट पंतप्रधानांना देखील जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
advertisement
मुंडे ताईंना न्याय देताना जात पाहिली नाही, मराठा समाजाला आरक्षण देताना तुम्ही विरोध करू नका
मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय देताना मी जात पाहिली नाही. मी ओबीसीचा विरोधक नाही. त्यामुळे माझ्या मराठा समाजाला आरक्षण देताना तुम्ही विरोध करू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना देखील केले आहे.
