इतर मागास प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण हवे, अशी मागणी करून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा समाजाचा सरकारविरोधात लढा तीव्र झालेला असताना गाव खेड्यातील सामान्य लोकही राजकारणी मंडळींना आरक्षण प्रश्नावरून जाब विचारू लागले आहेत.
गावखेड्याच्या मराठ्यांनी रावसाहेब दानवेंना पिटाळून लावलं
advertisement
शिरजगाव वाघरुळ येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम यासह इतर कामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत जोरदार गोंधळ घातला.
रावसाहेब दानवे हे उद्घाटन प्रसंगी बोलत असताना आमचे मराठा आंदोलक मुंबईमध्ये उपाशी मरत आहेत. तुम्ही गावाकडे उद्घाटन कशी काय करता? असा सवाल मराठा आंदोलकांनी रावसाहेब पाटील दानवे यांना केला. यावेळी दानवेंना कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला.
मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारची भूमिका काय?
इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी करीत मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई महापालिका परिसर, आझाद मैदान, मंत्रालय आदी भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईतल येतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला असताना सरकारकडून मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहे.