TRENDING:

राज्यात 48 लाख कुणबी नोंदी, किती जणांना मिळाली प्रमाणपत्रं? समोर आली आकडेवारी

Last Updated:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी लावून धरली होती. आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी लावून धरली होती. यासाठी त्यांनी अनेक मोर्चे, उपोषणं आणि आंदोलनं केली. त्यांनी मुंबईत येऊन सरकारला वेठीवर धरलं. एकीकडे जरांगे यांचा आरक्षणासाठी लढा सुरू असताना आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात किती कुणबी नोंदी आढळल्या, यातील किती जणांना कुणबी प्रमाणपत्रं मिळाली, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
News18
News18
advertisement

शिंदे समितीकडून अहवाल सादर

नुकतीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. तसेच मराठा आरक्षण आणि त्यासंदर्भातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पुढील दिशा काय असावी यावरही चर्चा करण्यात आली. दरम्यान, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला.

advertisement

राज्यात ४८ लाख कुणबी नोंदी आढळल्या

शिंदे समितीने काम सुरू केल्यापासून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आहेत. समितीच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे मराठा समाजातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 12 लाख 11 हजार 303 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

advertisement

संभाजीनगरमध्ये सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रं वितरीत

विभागनिहाय आकडेवारी पाहिली तर छत्रपती संभाजीनगर विभागात मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या विभागात आतापर्यंत 2 लाख 57 हजार 84 कुणबी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत संभाजीनगर विभागात 49 हजार 958 प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तर बीड जिल्ह्यात 34 हजार 692 कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली असल्याची माहितीही बैठकीत समोर आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्याविरोधात तसेच हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. या प्रकरणात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष समुपदेशक (स्पेशल कौन्सेल) नियुक्त करण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर सातारा गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त, पुणे यांनी सविस्तर अहवाल सादर करावा, असेही मंत्रिमंडळ उपसमितीने सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात 48 लाख कुणबी नोंदी, किती जणांना मिळाली प्रमाणपत्रं? समोर आली आकडेवारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल