TRENDING:

'गोळ्या घालून मारतो', मनोज जरांगेंना ठार मारण्याची धमकी, AUDIO क्लिपने उडवली खळबळ

Last Updated:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या हत्येचा कथित कट रचल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक देखील केली होती. मनोज जरांगे यांना ट्रकने उडवून त्यांचा अपघाती मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप स्वत: जरांगे यांनी केला होता. त्यांनी माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर हे खळबळजनक आरोप केले होते.
News18
News18
advertisement

ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात मनोज जरांगेंना जीवे मारण्याबाबत बोललं जात आहे. ही संवाद मनोज जरांगे समर्थक आणि वाल्मीक कराड समर्थक यांच्यातील असल्याचं संवादावरून स्पष्ट होतं आहे. न्यूज १८ मराठीने या ऑडिओ क्लिपची पुष्टी केली नाही. मात्र हा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

advertisement

संबंधित रेकॉर्डिंगमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड म्हणायचे नाही, नसता तुलाही जिवे मारतो असा कथित संवाद आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गोळ्या घालून जिवे मारणार असल्याचे बोलत आहे. त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड म्हणायचे नाही, अन्यथा जिवे मारतो अशी धमकी वाल्मीक कराड समर्थकाने जरांगे समर्थकाला दिली. या रेकॉर्डिंगमुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

advertisement

ऑडिओ क्लिपमध्ये नक्की संवाद काय?

जरांगे समर्थक : पाटलांना काय करणार ?

समोरील व्यक्तीः मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या? मी स्वतः गोळ्या घालतो.

जरांगे समर्थक : तू घालणार आहेस का ?

समोरचा व्यक्ती : मी स्वतः घालतो गोळ्या

जरांगे समर्थक : काय करणार आहेस पाटलांना ?

समोरचा व्यक्ती : मी तर मनोज जरांगे यांना जिवेच मारतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

मनोज जरांगे समर्थक : बरं चालतंय बरं

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'गोळ्या घालून मारतो', मनोज जरांगेंना ठार मारण्याची धमकी, AUDIO क्लिपने उडवली खळबळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल