TRENDING:

Satara: साताऱ्यातील कराड MIDC मध्ये पुन्हा कंपनीत भीषण स्फोट, 10 किमी परिसर हादरला, दिवसभरात 12 स्फोट

Last Updated:

गेल्या 12 तासात सलग 10 स्फोट झाले असून दुसरा अतिशय मोठ्या तीव्रतेचा स्फोट झाल्याने पुन्हा एकदा 10 किलोमीटर अंतरावरील परिसर हादरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

कराड:  सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. तासवडे एमआयडीमध्ये एका केमिकल कंपनीला सकाळी आग लागून स्फोट झाले. त्यानंतर रात्री पुन्हा एकदा भीषण असा स्फोट झाला. याा स्फोटाने १० किमी परिसर हादरून गेला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

कराड एमआयडीसीतील साईराम केमिकल कंपनीत सकाळी मोठा स्फोट झाला होता. गेल्या 12 तासात सलग 10 स्फोट झाले असून दुसरा अतिशय मोठ्या तीव्रतेचा स्फोट झाल्याने पुन्हा एकदा 10 किलोमीटर अंतरावरील परिसर हादरला आहे. फ्रेशर रिऍक्शन रियाक्टर फुटला असल्याची माहिती समोर आली असून याचा आवाज मोठा झाला होता.

advertisement

एमआयडीसी केली खाली, कामगारांना सोडलं घरी

सध्या एमआयडीसीतील सर्व कंपन्यांमधील कामगारांना घरी सोडण्यात आलं आहे. कारण, या स्फोटाच्या मालिकेसोबत आता परिसरात दुर्गंधी वास येऊ लागला आहे, तसंच लोकांना अंगाला खाज येवू लागला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण एमआयडीसीमधील  कंपन्यातील कामगारांनी घरी सोडण्यात आलं आहे.

सकाळी स्फोटाने १० किमी परिसर हादरला

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास  तासवडे औद्योगिक वसाहतीतील साईराम केमिकल कंपनीत पहिला स्फोट झाला होता.  या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, आजूबाजूच्या १० किलोमीटर परिसरातील गावे आणि वस्त्या अक्षरशः हादरल्या. अनेक घरांच्या आणि व्यावसायिक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.  स्फोटानंतर कंपनीतून आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे आकाश व्यापले होते. दिवसभर छोटे मोठे असे १२ स्फोट झाले.  स्फोटामुळे कंपनीच्या इमारतीचे मोठं नुकसान झालं आहे. आजूबाजूच्या कंपन्यांनाही या स्फोटामुळे धक्का बसला.   स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत  सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. पण, प्रशासनाकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आला नही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: साताऱ्यातील कराड MIDC मध्ये पुन्हा कंपनीत भीषण स्फोट, 10 किमी परिसर हादरला, दिवसभरात 12 स्फोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल