TRENDING:

अशा अधिकाऱ्यांना काय म्हणावं? दादांच्या निधनाच्या काही तासानंतरच त्या फायलींवर सह्या, ७५ प्रकरणं समोर

Last Updated:

Ajit Pawar Minority Department: अजित पवार यांच्या मृत्यूला काही तासच झालेले असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्थगिती असलेल्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शासकीय अधिकाऱ्यांचे निर्ढावलेपणा उघडकीस आणणारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतरही मंत्रालयात बसून अडकलेल्या फाईलींवर सह्या करून संबंधितांचा रस्ता मोकळा केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण अल्पसंख्याक खात्याशी संबंधित असून राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना फायलींवर सह्या करून अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ही प्रकिया स्थगिती होती.
अजित पवार
अजित पवार
advertisement

अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. राज्य शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्य शोक सागरात बुडाले असताना मात्र मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने फाईलींवर सह्या करून आपला 'स्वार्थ' पाहिला.

प्रकरण नेमके काय आहे?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्यांक खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिव्य प्रताप केला. ज्या फायलींना ऑगस्ट महिन्यापासून स्थगिती देण्यात आली होती किंबहुना त्यावर निर्णय घेण्यात आले नव्हते, त्याच फायलींवर अधिकाऱ्यांनी मागे पुढे न पाहता स्वाक्षऱ्या केल्या.

advertisement

धक्कादायक गोष्ट म्हणजे, यातील पहिले प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिले गेले. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी ७५ प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यांक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे.

कोणकोणत्या संस्थांना लाभ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Vi
सर्व पहा

महत्त्वाचे म्हणजे शासकीय कार्यालयांची वेळ संपल्यानंतरही साडे सहा, सात वाजताही फायलींवर सह्या झाल्या आहेत. 'पोदार'च्या २५ शाळांना २९ जानेवारी या एकाच दिवशी २५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेला आहे हे विशेष. स्वामी शांती प्रकाश आणि देव प्रकाशच्या चार शाळांना देखील लाभ देण्यात आला आहे. सेवादास महाराज शिक्षक प्रसारक मंडळ यवतमाळला अजित पवार यांच्या निधनादिवशीच प्रमाणपत्र देण्यात आले. एकंदर अजित पवार यांच्या मृत्यूदिवशीच सात शाळांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशा अधिकाऱ्यांना काय म्हणावं? दादांच्या निधनाच्या काही तासानंतरच त्या फायलींवर सह्या, ७५ प्रकरणं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल