TRENDING:

मनसेच्या तटस्थ राहण्याने ठाकरेंचे मनसुबे उधळणार, BMC प्रभाग समितीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर

Last Updated:

BMC Ward Committee Elections: प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जर मनसे तटस्थ राहिली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नुकसान होऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी असल्याचे दिसते. हीच नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतरही प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जर मनसे तटस्थ राहिली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मनसुबे उधळले जातील तसेच निवडणुकीत मोठा उलटफेरही होईल.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे
उद्धव ठाकरे-राज ठाकरे
advertisement

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगर पालिकेत तीन स्वीकृत नगरसेवक झाले. या पैकी एक नगरसेवक आमचा असावा, अशी मनसेची अपेक्षा होती. मात्र स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होते, अशी माहिती होती. मात्र यासंदर्भात शिवसेनेकडून कोणतीही पावले न टाकल्याने मनसेने निवडणुकीत तटस्थ राहण्याची ठाम भूमिका घेतली.

advertisement

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसू शकतो. त्यामुळे निवडणुकीत मोठा उलटफेर होऊन पुढची समीकरणे बदलणार आहेत.

कोणत्या प्रभाग समितीवर येणार कोणाची सत्ता? काय आहेत आकडे?

१) ए बी इ - महाविकास आघाडी

२) सी डी - महायुती

advertisement

३) एफ दक्षिण एफ उत्तर - महाविकास आघाडी (मनसे तटस्थ राहिली तर समसमान)

४) जी दक्षिण - महाविकास आघाडी

५) जी उत्तर - महाविकास आघाडी

६) एच पूर्व एच पश्चिम - आघाडी

७) के दक्षिण - महायुती

८) के उत्तर - महाविकास आघाडी (मनसे तटस्थ राहिली तरी महाविकास आघाडीचा अध्यक्ष)

advertisement

९) के पश्चिम - महायुती

१०) पी दक्षिण - महायुती

११) पी पूर्व पी पश्चिम - आघाडी (मनसे तटस्थ राहिली तरी महाविकास आघाडीचा अध्यक्ष)

१२) आर दक्षिण - महायुती

१३) आर मध्य आर उत्तर - महायुती

१४) एम पूर्व - एम आय एम

१५) एम पश्चिम - महायुती

१६) एस व टी - समसमान सदस्य (मनसे तटस्थ राहिली तर महायुतीचा अध्यक्ष)

advertisement

१७) एल - महाविकास आघाडी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‎वर्दीतला सुरेल आवाज, नोकरी सांभाळून गातात गाणी, अरुण यांचा अनोखा छंद, Video
सर्व पहा

१८) एन - महायुती

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनसेच्या तटस्थ राहण्याने ठाकरेंचे मनसुबे उधळणार, BMC प्रभाग समितीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल