सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून नव्हे तर राजकीय वादातून झाली आहे. भाजप लोकांचा रक्त सांडवून सत्ता मिळवण्याचं काम करत आहे, अशी टीका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
advertisement
मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसह पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेतली. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथं रविवारी महाविकास आघाडीतील नेते काळ्याफिती लावून निदर्शने करणार आहे. यावेळी प्रणिती शिंदे यांनी या हत्ये प्रकरणी भाजपवर सडकून टीका केली.
"सोलापूरमध्ये कधीच असा प्रकार घडला नाही. सोलापूरला काळिमा फासणारी घटना भाजपने केली आहे. राजकीय वादातून सोलापुरात बाळासाहेब सरवदे तरुणाची हत्या झाली आहे. कायदा आणि सुवव्यस्था कोलमडली आहे. पोलीस आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात भारतीय जनत पार्टीच्या दबाबाखाली काम करत आहे असं दिसून येत आहे. भाजप साम-दाम-दंड-भेद यानंतर आता लोकांचं रक्त सांडवत आहे. केवळ बिनविरोध निवडणूक करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. सत्तेचा माज आणि सत्तेची लालच या लोकांना आली आहे' अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली.
'महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने पोलिसांना हे पत्र दिलं आहे. कारवाई झाली पाहिजे. याला कोणतंही कौटुंबिक रंग न देता राजकीय हेतूने ही हत्या करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनीही राजकीय हेतूने ही हत्या झाली आहे, असं सांगितलं आहे. पोलिसांनी धडक कारवाई केली पाहिजे. सीडीआर तपासले पाहिजे, मारेकऱ्यांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली.
'सोलापुरातली निवडणूक ही पारदर्शक झाली पाहिजे, कारण भाजपकडून अमाप पैसा वाटप केला जात आहे. १० वाजेनंतर आचारसंहिता भंग केली जात आहे. भाजपकडून झाली तर कारवाई होत नाही, पण विरोधकांकडून झााली तर दबाव आणला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आपली भूमिका पारदर्शक केली पाहिजे. निवडणूक ही दबाबवाखाली केली जात आहे, निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी सुद्धा दबाव टाकला जात होता. अजूनही निवडणूक आयोगाकडून याद्या जाहीर झाल्या नाही. लोकांची नाव अजून यादीत दिसत नाही. हा गंभीर प्रकार घडत आहे. लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला जाात आहे. तुम्हाला कसली भीती आहे, आमचेच लोक पळवून नेत आहात आणि दबाव टाकत आहे. ३ वाजेनंतर अर्ज स्विकारले जात नाही. पण तरीही अर्ज स्विकारले जात आहे. हे कोणत्या स्तराला निवडणूक घेऊन जात आहे, ही लोक एवढ्या खाली घसरले आहे की सत्तेसाठी लोकांचा खून करत आहे, अशी टीकाही प्रणिती शिंदे यांनी केली.
'उद्या सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत आम्ही शांतेत आंदोलन करणार आहोत. काळ्या फिती लावून आंदोलन करत आहोत. पोलिसांना आम्ही याबद्दल सांगितलं आहे, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.
