नवी मुंबई : नवी मुंबईतून माणुसकीला आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस झाली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाने भारतात येऊन अवघ्या 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल दोन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या अमानुष अत्याचाराला पीडितेची जन्मदात्री आईनेच साथ देत होती, असा धक्कादायक तपास पोलिसांनी उघड केला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तळोजा परिसरात ही घटना घडली. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या तपासात पैशांच्या लालसेपोटी ही घृणास्पद घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी नराधम आरोपीसह पीडित बालिकेच्या निर्दयी आईलाही अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव फारुक अल्लाउद्दीन शेख (वय ७०) असून तो मुळचा पाँडेचेरीचा रहिवासी आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक आहे. फारुक शेखने दोन वर्षांपूर्वी तळोजा सेक्टर-20 मध्ये फ्लॅट खरेदी केला होता, जिथे तो दर काही महिन्यांनी लंडनहून येऊन दोन-तीन दिवस वास्तव्यास राहायचा. त्याच काळात त्याची ओळख घरकामाच्या निमित्ताने पीडित मुलीच्या आईशी झाली होती.
मद्यपान करून करायचा लैंगिक अत्याचार
आई दर वेळी मुलगी खेळायला जातेय या बहाण्याने तिला फारुकच्या घरी सोडत असे. आरोपी त्यावेळी मुलीला मद्यपान करायला लावून तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करीत होता. पीडितेनं कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.
या प्रकरणाची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक निरीक्षक योगेश देशमुख, निलम पवार आणि सरिता गुडे यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी तळोजा सेक्टर-20 येथील आरोपीच्या फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आरोपी फारुक शेखला ताब्यात घेऊन पीडित मुलीची सुटका केली.
आईच पाठवायची आरोपीकडे!
तपासादरम्यान समोर आले की, पीडित मुलीच्या आईने फारुककडून घरभाड्यासाठी अडीच लाख रुपये घेतले होते. याशिवाय दर महिन्याचे रेशनही त्याच्याकडून मिळणाऱ्या पैशांतून घेत होती. या बदल्यात ती स्वतःच्या मुलीला वारंवार फारुककडे पाठवत असल्याचं चौकशीत उघड झाले आहे. आईला आपल्या मुलीवर अत्याचार होत असल्याचे माहीत असूनही, केवळ पैशांच्या मोहापायी तिने हे अमानुष कृत्य चालू ठेवलं होतं. या कबुलीनंतर पोलिस अधिकारीही स्तब्ध झाले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर तळोजा पोलीस ठाण्यात बलात्कार, अनैतिक मानवी वाहतूक आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी फारुक अल्लाउद्दीन शेख आणि पीडित मुलीची आई दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पनवेल-तळोजा परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घरातून सेक्स टॉय जप्त
छाप्यात पोलिसांनी आरोपीच्या फ्लॅटमधून दारूच्या बाटल्या, सेक्स पॉवर गोळ्या, सेक्स टॉय, व्हायब्रेटर, व्हॅसलीन, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, DVR अशा अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांकडून या वस्तूंचा तांत्रिक तपास सुरू आहे.
