TRENDING:

Shirdi : पोटाच्या खळगीसाठी आईचा संघर्ष; बागडण्याच्या वयात मुलांना साखळीने बांधते, शिर्डीची मन हेलावणारी घटना

Last Updated:

पोटच्या लेकरांना साखळीने बांधून ठेवत आई भंगार वेचत असल्याचा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार शिर्डीतून समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
पोटाच्या खळगीसाठी आईचा संघर्ष; बागडण्याच्या वयात मुलांना साखळीने बांधते, शिर्डीची मन हेलावणारी घटना
पोटाच्या खळगीसाठी आईचा संघर्ष; बागडण्याच्या वयात मुलांना साखळीने बांधते, शिर्डीची मन हेलावणारी घटना
advertisement

शिर्डी : पोटच्या लेकरांना साखळीने बांधून ठेवत आई भंगार वेचत असल्याचा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार शिर्डीतून समोर आला आहे. आपल्या लेकरांना साखळीने बांधून ठेवत एक आई तासनतास भंगार वेचण्याचं काम करायला निघून जात होती. स्थानिकांनी या महिलेला हटकल्यानंतर तिने पोरांना घेऊन पोबारा केला आहे. या घटनेचे व्हिडिओ ही फोटो समोर आले आहेत.

advertisement

साईबाबांची शिर्डी एक ना अनेक प्रकारच्या घटनांमुळे सध्या चर्चेत येत आहे, त्यातच आता पोटाची खळगी भरण्यासाठी आईच्या संघर्षाचा डोळ्यात पाणी आणणारा प्रकार समोर आला आहे. शिर्डी बस स्थानक परिसरात आपल्या लहान मुलांना साखळीने बांधून ठेवत महिला भंगार गोळा करायला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भंगार आणि बाटल्या जमा कऱणारी महिला तिच्या लहान मुलांना एक हातगाडीला साखळी कुलूपाने तासनतास बांधून ठेवत होती. स्थानिक नागरिकांनी महिलेला जाब विचारला असता तिने उलट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर ही महिला मुलांना घेऊन पसार झाली आहे.

advertisement

शिर्डी बस स्टॅण्डच्या परिसरात ही महिला तिची 8 महिन्यांची मुलगी आणि साडेचार वर्षांचा मुलगा यांना साखळी कुलूपात बांधून ठेवायची. आम्हाला जाता येता हे बघतानाही वाईट वाटायचं, याबाबत आम्ही एसटीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. या महिलेवर कुणीच कारवाई केली नाही. यानंतर आम्ही महिलेला हे योग्य नसल्याचं समजावलं, पण उलट तिनेच आम्हाला विनयभंगाचे गुन्हे दाखल करू, अशा धमक्या दिल्या. मागच्या चार ते पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

मुलांचे खूप हाल होत होते. मुलांना आश्रमात ठेव, तिकडे त्यांचं शिक्षण होईल, आयुष्य होईल, असं त्या महिलेला सांगितलं, पण महिला उलट आमच्यावरच चिडली. आम्ही शिर्डी बस स्टॅण्डच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितलं, पण तेही या महिलेपुढे हतबल होते, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi : पोटाच्या खळगीसाठी आईचा संघर्ष; बागडण्याच्या वयात मुलांना साखळीने बांधते, शिर्डीची मन हेलावणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल