मुख्य परीक्षेचा निकाल दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र ठरलेल्या १ हजार ५१६ उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम टप्प्याटप्प्याने लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या निकालाकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले होते. निकाल वेळेवर जाहीर झाल्यामुळे उमेदवारांच्या भावी नियोजनाला गती मिळणार आहे. मुलाखतीचे वेळापत्रक व पुढील सर्व माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mpsc.gov.in उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
advertisement
ज्यांना गुणांवर शंका त्यांच्यासाठी फेरपडताळणी, गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत अर्ज करा
मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची असल्यास संबंधित उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे