ओतूर मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात, प्रशासनाकडे मागण्या करूनही सतत दुर्लक्ष
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत एकूण 434 रिक्त पदांवर शिकाऊ उमेदवारांची मेगा भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन भरावा लागणार आहे. शिवाय, आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन नमुना अर्ज रत्नागिरी एसटी विभाग कार्यालयात दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करणे आवश्यक आहे, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.
advertisement
रेल्वेमध्ये 10वी- 12वी उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी! शेवटची तारीख कोणती...
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी एसटी महामंडळामध्ये एक वर्षांचा प्रशिक्षण प्रशिक्षण कालावधी असणार आहे. यांत्रिक डिझेल 110, यांत्रिक मोटारगाडी 110, बीजतंत्री 60, पत्राकारागीर 44, सांधाता 25, कातारी 10, यंत्र कारागीर 10, रेफिजरेशन अँड एयर कडीशनिंग 5, साठा जोडारी 44, सुतार 4, रंगारी 10, शिवणकाम 2 या विविध पदांवर शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. नोकरीच्या ह्या जाहिरातीमध्ये, कोणतीही वयोमर्यादेची नोंद करण्यात आलेली नाही. अधिकाधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.