Railway Job 2025 : रेल्वेमध्ये 10वी- 12वी उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी! 30 हजारांहून अधिक जागांवर मेगाभरती..

Last Updated:

Railway Job 2025 : दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. फार मोठ्या काळानंतर रेल्वेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे.

Railway Update: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, 6 गाड्या उशीराने धावणार, बघा वेळापत्रक
Railway Update: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, 6 गाड्या उशीराने धावणार, बघा वेळापत्रक
सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी आणि भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. जर, तुम्ही रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधत असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. फार मोठ्या काळानंतर रेल्वेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. मेगाभरती होणार असल्याने महाराष्ट्रातल्या अनेक तरूणांना नोकरीची संधी मिळाली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून ह्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. किती पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे ? कोणकोणत्या प्रमुख शहरांमध्ये भरती होणार आहे ? माहिती जाणून घेऊया...
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरअरबी) च्या माध्यमातून एनटीपीसी भरती २०२५ अंतर्गत ३०हजार पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. ही भरती विविध पदांसाठी केली जाणार आहे. यामध्ये, क्लर्क, स्टेशन मास्टर, गार्ड, टायपिस्ट, कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिस आणि इतर महत्त्वाच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अनेक तरूणांचं रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असतं, त्यांचं आता स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेमध्ये भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया यासंबंधित सर्व तपशील खाली दिलेले आहेत.
advertisement
आरआरबीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या पदासाठी किती उमेदवारांसाठी नोकर भरती आहे, ही सर्व माहिती देण्यात आली आहे. भरतीमध्ये देशातल्या राज्यातील सर्व उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची प्रत तयार ठेवावी. ऑनलाईन अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवारांना सवलत देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असून उमेदवारांना त्याच प्रमाणे अर्जाचे शुल्क भरायचे आहे. परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर, अर्थातच शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज भरावे.
advertisement
30,307 पद संख्येमध्ये ही नोकर भरती केली जाणार आहे. अर्ज भरण्याची तारीख 30 ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे, तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबरपासून आहे. अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in वर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. क्लर्क, स्टेशन मास्टर, कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिस, गुड्स गार्ड, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट या पदांसाठी ही भरती होणार आहे. यात शैक्षणिक पात्रता म्हणजे उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा. काही पदांसाठी पदवीधर उमेदवार आवश्यक आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत व अर्ज शुल्क भरावे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Job 2025 : रेल्वेमध्ये 10वी- 12वी उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी! 30 हजारांहून अधिक जागांवर मेगाभरती..
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement