TRENDING:

राजीनामा दिल्याबरोबर आशिष शेलारांची भेट, मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ भाजपमध्ये प्रवेश करणार?

Last Updated:

शुभा राऊळ यांनी राजीनामा दिल्याबरोबर भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे राजीनामा दिल्याबरोबर त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शुभा राऊळ-आशिष शेलार
शुभा राऊळ-आशिष शेलार
advertisement

शुभा राऊळ यांच्या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. मुंबईतील जवळपास ६० हून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंना सोडून शिंदेसेना-भाजपत प्रवेश केला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर थेट माजी महापौर राऊळ यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरेंना मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.

शुभा राऊळ भाजपमध्ये जाणार?

शुभा राऊळ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. राजीनामा देण्याआधीच त्यांची भाजप नेत्यांसोबत प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. आज रविवारी शुभा राऊळ यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन प्रवेशाविषयी अंतिम चर्चा केली. राऊळ या मुंबईतील दहिसर भागाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या प्रवेशाने भाजपला दहिसर, मीरा रोड, बोरिवली भागांत पक्षाला फायदा होईल, असे सांगितले जाईल.

advertisement

शुभा राऊत यांनी राजीनामा देताना काय म्हटले?

मी, शुभा उमेश राऊळ, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर आणि आपल्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून मनापासून शिवसेनेत कार्यरत राहिले आहे. तथापि, काही कारणास्तव मला शिवसेना अंतर्गत शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्ष या पदाचा तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे, याची नोंद घ्यावी. आपणा सर्वाकडून मिळालेल्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल मी आभार व्यक्त करत आहे, असे शुभा राऊळ राजीनामा देताना म्हणाल्या.

advertisement

कोण आहेत शुभा राऊळ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
सर्व पहा

शुभा राऊळ ३३ महिने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर होत्या. महाराष्ट्र सरकारच्या कोविड-१९ आयुष टास्क फोर्सच्या सदस्या होत्या. १० मार्च २००७ रोजी त्या महापौरपदी निवडून आल्या होत्या. मुंबईच्या तिसऱ्या महिला महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. दहिसर भागाचे प्रतिनिधित्व राऊळ यांनी केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजीनामा दिल्याबरोबर आशिष शेलारांची भेट, मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ भाजपमध्ये प्रवेश करणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल